संगणकाचे फायदे व तोटे, संपूर्ण माहिती

    संगणकाने मानवाच्या जीवनात खूप महत्त्वाचे बदल घडवून आणले आहेत. आपल्या जीवनातील जवळपास प्रत्येक क्षेत्रात संगणकाचा उपयोग केला जातो. संगणक शिवाय आता मानवाचे जीवन खूप कठीण आहे. हे मानवाच्या जीवनाचा एक हिस्सा बनले आहे.

    आपण हे ऐकले असेल की प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात, संगणकाचे ही असेच आहे. संगणकाचे फायदे तर आहेतच, पण त्या प्रमाणात तोटे पण आहेत. तर आजच्या या लेख मध्ये आपण संगणकाचे फायदे व तोटे Advantages and Disadvantages of Computer in Marathi यांची माहिती घेणार आहोत. तर चला वेळ ना लावता मुख्य माहितीकडे वळूयात.

संगणकाचे फायदे- Advantages and of Computer in Marathi

    आता आपण सर्वात आधी संगणकाचे मुख्य फायदे पाहुयात.

1) गती (Speed)

    संगणकाची गती हा एक सर्वात उपयोगी पडणारा फायदा आहे. Computer ची गती इतकी आहे की, कोणताही मानव संगणक पेक्षा जास्त वेगाने गणिते सोडवू शकत नाही.

     संगणक असंख्य गणिते एका वेळेस सोडवू शकतो. संगणकाच्या गतीला मोजण्यासाठी Microsecond, Nanosecond आणि Picosecond ही एकक वापरली जातात.

2) अचूकता (Accuracy)

    संगणकाची गती अफाट आहेच, परंतु संगणकाने सोडवलेली गणिते 100% बरोबर असतात. संगणकाला कोणतेही गणित द्या, तुम्हाला मिळालेले उत्तर बरोबरच असेल.

     याचे कारण असे की संगणकात प्रोग्रॅम टाकलेले असतात व त्यानुसार संगणक अचूकतेने गणिते सोडवते. मानवाच्या क्षमते बाहेरची कामे संगणक अचूकतेने करते.

3) ज्ञानाचा श्रोत (Knowledge Source)

    संगणकाला ज्ञानाचे श्रोत बनवण्याचे श्रेय इंटरनेट ला जाते. इंटरनेट व संगणकाच्या एकत्रीकरण ने संपूर्ण मानवी जीवन बदलून टाकले आहे. इंटरनेट वरील वेबसाईट आपल्याला अफाट माहिती प्रदान करतात.

    आपल्याला फक्त सर्च इंजिन वर जाऊन शोधायचे असते. संगणक आपल्याला हव्या त्या वेबसाईट वर नेऊन सोडते. आजच्या काळात इंटरनेट वर 1.7 अब्ज वेबसाईट आहेत.

4) स्वयंचलन (Automation)

    संगणकाच्या स्वयंचलन चा फायदा मोठं- मोठ्या कंपन्या/ कारखान्यात होतो. कारखान्यात असलेल्या मशीन ची कार्ये संगणक प्रोग्रामिंग द्वारे स्वयंचलीत केले जातात, त्यामुळे मशीन आपोआप कार्य करते.

    मानवी हस्तक्षेप करण्याची गरज लागत नाही. संगणकाच्या स्वयंचलन तंत्रज्ञानामुळे वस्तूंची उत्पादकता वाढली आहे. नुसते हे नाही, तर अजून खूप कार्य आहेत जी संगणकाच्या मदतीने स्वयंचलित झाली आहेत.

5) संप्रेषण (Communication)

    संगणकाचा Communication क्षेत्रात खूप फायदा झाला आहे. संगणकाने संप्रेषण मध्ये अमुलाग्र बदल घडवून आणले आहेत. आता आपण जगातील कोणत्याही व्यक्तीसोबत घरबसल्या बोलू शकतो. Video Call ने आपण कोणत्याही व्यक्तीला Live पाहू शकतो.

    मोबाईल फोन, टॅबलेट, यांच्या वापरामुळे Communication वाढले आहे. संगणकाने Calling, Video Chatting या सुविधा दिल्या आहेत, यांचा वापर आज प्रत्येक व्यक्ती आपल्या दूर असलेल्या नातेवाईक सोबत किंवा मित्रांसोबत बोलण्यासाठी करत आहे.

6) स्टोरेज क्षमता (Storage Capacity)

    मानवी मेंदूच्या तुलनेत संगणकाची माहिती साठवण्याची क्षमता खुप जास्त आहे. आपण संगणकात हवी तितकी माहिती साठवून ठेऊ शकतो. संगणकात Audio, Video, Text, Image, ई रुपात माहिती साठवली जाते.

     आपण हव्या त्या वेळी माहिती मिळवू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संगणक माहिती विसरत नाही. आपण जर Delete केली तरच ती हटवली जाते. संगणकाची स्टोरेज क्षमता मोजण्यासाठी Bits, Kilobytes, Megabytes, Gigabytes ही एकक बनवलेली आहेत.

7) मेहनती (Diligence)

   संगणक एक मशीन आहे, आणि मशीन ला जो पर्यंत वीज मिळत नाही तोपर्यंत ती काम करत राहते. संगणकाला कधीही थकवा येत नाही. संगणकावर काम करत असलेला कर्मचारी थकतो पण संगणक काहीही थकत नाही.

   संगणकाची कार्ये करण्याची गती कधीही कमी होत नाही. यामुळे संगणक हे एक खूप मेहनती व थकान मुक्त उपकरण आहे.

संगणकाचे तोटे- Disadvantages of Computer in Marathi

    आपण संगणकाचे फायदे पाहिले आहेत, आता तोटे पाहुयात.

1) वेळेची नासाडी (Wastage of Time)

    संगणकाचे जेवढे फायदे आहेत, तेवढे तोटे पण आहेत. संगणकात असलेल्या सोशल मीडिया, गेम्स, ई. यांचा अतिवापर होत आहे. कित्येक लोकांना सोशल मीडिया चे व्यसन लागले आहे. दिवसभर लोक सोशल मीडिया वर असतात.

    विद्यार्थ्यांच्या भविष्यावर याचा वाईट परिणाम होत आहे, त्यामुळे संगणकाचा वापर करू नका असे नाही, पण अतिवापर करू नका.

2) आरोग्याच्या समस्या (Health Issues)

    संगणकाचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो. मोबाईल, टॅबलेट, लॅपटॉप, ई. यांचा अतिवापर आरोग्यासाठी हानिकारक ठरतो. मोबाईल जास्त वेळ वापरल्याने आपल्या डोळ्यांना त्रास होतो आणि मग चष्मा लागतो. मोबाईल ची स्क्रीन डोळ्यांसाठी खूप हानिकारक असते.

    जास्त वेळ सलग मोबाईल बघत बसल्याने ब्रेन हेमरेज नावाचा आजार होतो. या आजाराने अनेक लोकांचे जीव गेलेले आहेत, त्यामुळे अश्या गोष्टींपासून लांब राहिलेले चांगले असते.

3) सुरक्षा (Security)

    आपण आपली वयक्तिक माहिती जसे फोटो, विडिओ, कागदपत्रे हे Computer मध्ये साठवून ठेवतो. आपल्याला वाटते की आपली माहिती सुरक्षित आहे, पण ती पूर्णपणे सुरक्षित नसते. याचे कारण म्हणजे Hackers.

    Hackers हे आपल्या संगणकातील माहिती चोरू शकतात, त्यांचा वाईट पध्दतीने उपयोग करू शकतात. राष्ट्रीय सुरक्षेचा डेटा सुद्धा हॅकर्स चोरू शकतात. त्यामुळे सुरक्षेच्या बाबतीत संगणकावर विश्वास ठेवणे जरा जड वाटते.

4) सायबर गुन्हे (Cyber Crimes)

    आजच्या सोशल मीडिया च्या युगात कोणती गोस्ट Viral होईल सांगताच येत नाही, पण नकळत यात काही वाईट गोष्टी पण Viral होतात आणि वयक्तिक पण आणि यातून Cyber गुन्हे निर्माण होतात.

    आज- काल सायबर गुन्ह्यांचे प्रमाण खूप वाढत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर काही शेअर करताना विचार करून शेअर करावे, नाहीतर तुमच्यावर सुद्धा गुन्ह्याची केस होऊ शकते.

5) बेरोजगारी (Unemployment)

    आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की संगणकाचा वापर कंपन्या कारखान्यात खूप मोठ्या प्रमाणात होत आहे आणि अजूनही वाढत आहे. कारखान्यातील मशीन संगणकाच्या तंत्रज्ञानाने स्वयंचलित झाल्या आहेत. त्यामुळे कामे कमी वेळेत पूर्ण होतात, तेथे माणसाची गरज राहिलेली नाही. यामुळे तरुणांच्या नोकऱ्या कमी झाल्या आहेत.

    कामगारांची कामे संगणकाने हिसकावून घेतली आहेत. कंपन्यांमध्ये संगणक वापरण्याचा फायदा असा की संगणक पगार घेत नाही आणि विना थकता सतत काम करत राहते, पण दुसऱ्या बाजूने बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढतच चालली आहे.

निष्कर्ष-

    प्रत्येक गोष्टीचे फायद्या सोबत तोटे ही असतात. संगणकाचा वापर आपण मापक प्रमाणात योग्य गोष्टीसाठी केला तर आपला फायदा होतो आणि जर आपण अतिवापर केला तर याचे दुष्परिणाम दिसायला लागतात.

    वरील लेख मध्ये मी आपल्याला संगणकाचे फायदे व तोटे Advantages and Disadvantages of Computer in Marathi समजावून सांगितले आहेत. याबद्दल आपला अभिप्राय खाली कंमेंट द्वारे नक्की सांगा.

    आपल्याला जर माझा हा लेख आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि संगणक विषयी अधिक माहितीसाठी या वेबसाईटला वारंवार भेट देत राहा.

Leave a Comment