ब्लॉगर मध्ये कस्टम थीम कशी इंस्टॉल करावी?

    सर्वात प्रथम आपले डिजिटल माहिती या मराठी वेबसाईटवर आपले स्वागत आहे. आजच्या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत की ब्लॉगर ब्लॉगमध्ये कस्टम थीम इंस्टॉल कशी करायची. आपल्याला माहीत नसेल की कस्टम थीम काय असते तर मी सांगतो. Blogger. com हे एक लोकप्रिय ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे, ब्लॉगर वर ब्लॉग बनवणे खूप सोपे आहे, परंतु ब्लॉग डिजाईन करण्यासाठी ब्लॉगर वर चांगल्या थीम्स उपलब्ध नाहीत. ब्लॉगर ब्लॉगसाठी इंटरनेट वर असंख्य थीम्स उपलब्ध आहेत, याना कस्टम थीम म्हणतात.

    ब्लॉगर मध्ये आधीपासूनच काही थीम उपलब्ध करून दिलेल्या आहेत, परंतु या थीम मध्ये जास्त Customization करता येत नाही, यामुळे या थीम डिजाईन मध्ये मागे पडतात. कस्टम थीम मध्ये जास्त Customization करण्याचे पर्याय असतात, यामुळे ब्लॉग ची डिजाईन चांगली बनवता येते व ब्लॉग आकर्षण दिसतो. तर चला ब्लॉगर वर कस्टम थीम इंस्टॉल करण्याची प्रक्रिया Step by Step पाहुयात.

ब्लॉगर मध्ये कस्टम थीम कशी इंस्टॉल करावी?

    थीम इंस्टॉल करण्याआधी आपल्याला ती इंटरनेट वरून डाउनलोड करावी लागते. काही वेबसाईट थीम विकतात आणि काही ठिकाणी फ्री मध्येही थीम मिळतात. सर्वात पहिले आपण गुगल वर जाऊन एखादी चांगली थीम शोधायची आहे. चला आपण विस्तारित प्रक्रिया पाहुयात.

Step 1: आपल्या ब्लॉगसाठी कस्टम थीम डाउनलोड करणे.

    थीम इंस्टॉल करण्याआधी आपल्याकडे ब्लॉगसाठी एक योग्य थीम असली पाहिजे. इंटरनेट वर हजारो थीम फुकट मध्ये उपलब्ध आहेत. गुगल वर Free Blogger Themes असे सर्च करायचे आहे, व आलेल्या वेबसाईट वर जाऊन हवी ती थीम डाउनलोड करायची आहे.

blogger custom theme install

थीम डाउनलोड करण्यासाठी काही लोकप्रिय वेबसाईट-

1) Goyaabi Templates

2) Sora Templates

4) Premium Blogger Templates

    डाउनलोड केलेली थीम आपल्याला .zip file मध्ये मिळेल. ब्लॉगर मध्ये आपण .zip file अपलोड नाही करू शकत. हे कसे करायचे यासाठी Step 2 पाहा.

Step 2: डाउनलोड केलेली .zip file Extract करणे.

    ब्लॉगर .zip फाईल ला सपोर्ट करत नाही, यासाठी ही फाईल Extract करून त्यातील .xml फाईल बाहेर काढावी लागते. कॉम्पुटर वर झिप फाईल Extract करण्याची प्रक्रिया सोपी आहे.

blogger custom theme install

    मोबाईल असेल तर मोबाईल मध्ये अगदी सहजपणे zip फाईल Extract करता येते. Extract केल्यावर त्यातील .xml फाईल आपल्याला ब्लॉगर मध्ये अपलोड करायची असते, यासाठी पुढील Step पाहा.

Step 3: Extract केलेली .xml फाईल अपलोड करणे.

    .xml फाईल अपलोड करण्यासाठी सर्वात पहिले ब्लॉगर वर लॉगिन करावे. व Dashboard वर जावे.

१) Dashboard मध्ये आपल्याला Theme पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे.

२) चित्रात दाखवलेल्या ऑपशन वर क्लिक करावे.

३) आता Restore वर क्लिक करून येथे .xml फाईल अपलोड करावी.

४) फाईल अपलोड होण्यास थोडा वेळ लागतो, अपलोड झाली का नाही पाहण्यासाठी View Blog वर जावे.

Step 4: ब्लॉग सुंदर दिसण्यासाठी थीम Customize करणे.

    थीम इंस्टॉल केल्यावर त्यात काही बदल करावे लागतात, कारण थीम मध्ये काही अनावश्यक Widgets आलेले असतात. यांना काढून टाकावे लागते. याबरोबरच ब्लॉगचा रंग आपल्या आवड नुसार बदलावा लागतो. हे करण्यासाठी ब्लॉगर मध्ये दोन पर्याय आहेत. Layout आणि Customize.

blogger custom theme install

Layout : या पर्यायात आपण ब्लॉग मध्ये असलेली Widgets/ Gadgets काढू शकतो किंवा नवीन जोडू शकतो. ब्लॉगमध्ये मेनू जोडण्याची प्रक्रिया सुद्धा येथूनच केली जाते. ब्लॉग डिजाईन करण्यासाठी Layout हा पर्याय खूप उपयोगाचा आहे.

blogger custom theme install

Customize : ब्लॉगच्या डिजाईन साठी Customize पर्याय वापरावा लागतो. यात आपण ब्लॉगचे Colours Edit करू शकतो. Font, Font Size Header, Footer Edit करण्याचे पर्याय येथे देण्यात आलेली आहेत. आपल्याला Customize करता येत नसेल तर शिकून घ्या कारण, हे ब्लॉगसाठी खूप महत्वाचे असते.

निष्कर्ष-

    ब्लॉगर ब्लॉग मध्ये कस्टम थीम इंस्टॉल करण्याची पूर्ण प्रक्रिया आपल्याला समजली असेल असे मला वाटते. कस्टम थीम इंस्टॉल करताना जर काही अडचण येत असेल तर खाली कंमेंट मध्ये विचारू शकता, आपली समस्या दूर केली जाईल.

    आजचा लेख आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका व आपल्याला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर आपला अभिप्राय कंमेंट मध्ये नोंदवा. ब्लॉगिंग, SEO बद्दल अधिक टिप्स साठी या ब्लॉगला वारंवार भेट देत राहा. धन्यवाद!

1 thought on “ब्लॉगर मध्ये कस्टम थीम कशी इंस्टॉल करावी?”

Leave a Comment