गुगल पे कसे वापरावे – How to Use Google Pay?

    गुगल पे हे Google ने लाँच केलेले Digital Payment App आहे. या App चे नाव आधी Google Tez असे होते. गुगल पे हे UPI आधारित कार्य करणारे App आहे, जे NPCI द्वारे संचालित केले जाते. NPCI ही एक सरकारी संस्था आहे जी भारतातील सर्व बँकिंग प्रणालीला संचालित करते.

    ऑनलाईन पेमेंट साठी वापरले जाणारे हे एक लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे, याच्या मदतीने आपण ऑनलाईन पेमेंट, मोबाईल रिचार्ज, बिल भरणे, ई कामे अगदी काही मिनिटात करू शकता. हे एप गुगल प्ले स्टोर वर उपलब्ध आहे. गुगल पे डाउनलोड करण्यासाठी आम्ही खाली लिंक दिली आहे.

    आजच्या या लेखात आपण गुगल पे कसे वापरायचे हे शिकणार आहोत. आपल्याला माहीतच असेल की सध्या सर्वकाही ऑनलाईन होत आहे, ऑनलाईन पेमेंट च्या मदतीने आपला बँकेत जाण्याचा वेळ सुद्धा वाचतो. त्यामुळे गुगल पे चा वापर कसा करावा हे अपल्याला सर्वांना माहीत असले पाहिजे.

गुगल पे कसे वापरावे – How to Use Google Pay?

    गुगल पे च्या मदतीने विविध कामे करता येतात. त्यातील काही महत्वाची कार्ये आपण येथे शिकण्याचा प्रयत्न करूयात. त्याआधी गूगल पे इंस्टॉल करून घेऊयात, त्यासाठी खालील Button वर क्लिक करा.सर्वांनी गुगल पे इंस्टॉल केले असे समजून पुढे जाऊयात.

गुगल पे वर खाते कसे तयार करावे?

आता आपल्याला गूगल पे वरती खाते बनवावे लागते त्यासाठी खालील प्रक्रिया पूर्ण करा. खाते खोलण्यासाठी आपल्याकडे खालील गोष्टी असाव्यात.

  • 1) बँक खाते
  • 2) डेबिट किंवा क्रेडिट कार्ड
  • 3) गुगल खाते
  • 4) बँक अकाउंट ला मोबाईल नंबर लिंक असावा.

हे सर्व आपल्याकडे असल्यावर पुढील प्रक्रिया कडे वळावे.

1) आता आपण गूगल पे एप इंस्टॉल केलेले आहे. हे एप आता मोबाईल मध्ये चालू करायचे आहे.

2) पुढे बँक खात्याला लिंक असलेला मोबाईल नंबर दिलेल्या जागेत टाकायचा आहे.

3) OTP ची प्रक्रिया झाल्यावर आपला G-Mail पत्ता निवडावा.

4) गुगल पे च्या सुरक्षेसाठी Screen Lock किंवा Pin Lock टाकावे.

5) आता आपले गूगल पे मध्ये खाते तयार झाले आहे. आता आपल्या बँक अकाउंट ला गुगल पे मध्ये Add करा.

गुगल पे वरून पैसे कसे पाठवायचे?

    गुगल पे वरून आपण कोणालाही पैसे पाठवू शकता. त्यासाठी यामध्ये अनेक पर्याय दिलेले आहेत. त्यांचा वापर करून आपण सहजपणे पैसे पाठवू शकता. तर चला आता ते पर्याय कोणते आहेत ते पाहुयात.

1) QR Code –

QR Code हा एक डिजिटल सुरक्षा कोड असतो. आपण विविध ठिकाणी किराणा दुकानात, मोबाईल शॉप मध्ये, हा QR कोड पाहिला असेल. या कोड च्या मदतीने पैसे पाठवण्यासाठी गुगल पे मधील Scan – QR Code पर्यायावर क्लिक करायचे आहे.

आता आपला कॅमेरा ओपन होईल, व ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्यांचा QR कोड स्कॅन करायचा आहे. हे झाल्यावर आपण त्यांना सहजपणे पैसे पाठवू शकता.

2) Pay Phone Number –

ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत त्यांचा Google Pay Number तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्यांना त्या नंबर च्या मदतीने पैसे पाठवू शकता.Pay Phone Number यावर क्लिक करा आणि त्यांचा नंबर टाका. त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करा.

3) Bank Transfer –

Bank Transfer हा पर्याय वापरण्यासाठी आपल्याकडे समोरच्या व्यक्तीचे Bank Details असले पाहिजेत. अकाउंट नंबर, IFSC Code, व त्याचे नाव हे असले पाहिजे फक्त.

Bank Transfer पर्यायावर क्लिक करून त्यांचे Bank Details भरायचे आहे व पुढील प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

4) Pay to UPI Id –

आपल्याकडे जर फक्त समोरच्या व्यक्तीचा UPI Id असेल तर हा पर्याय वापरावा. UPI Id हा आपण गुगल पे खात्याच्या प्रोफाइल मध्ये मिळवू शकता.

Pay to UPI Id यावर क्लिक करा आणि समोरच्या व्यक्तीचा UPI Id तेथे टाका. व पुढील प्रक्रिया पूर्ण करा.

गुगल पे वरून मोबाईल रिचार्ज कसा करावा?

गुगल पे वरून मोबाईल रिचार्ज करणे खूप सोपे आहे. तर चला गुगल पे वरून मोबाईल रिचार्ज करणे शिकूयात.

1) गुगल पे मधील Mobile Recharge या पर्यायावर क्लिक करा.

2) रिचार्ज करावयाचा नंबर टाका किंवा आपल्या कॉन्टॅक्ट मधून निवडा.

3) आता कोणता रिचार्ज टाकायचा आहे तो प्लॅन निवडा.

4) आता Pay वर क्लिक करा, ATM पिन टाका व रिचार्ज पूर्ण होईल.

गुगल पे वरून Bank Balance कसा चेक करावा?

बँक balance चेक करण्याची सुविधाही गुगल पे मध्ये देण्यात आलेली आहे.

त्यासाठी Check Bank Balance या पर्यायावर क्लिक करा आणि ATM pin टाकून Bank Balance चेक करू शकता.

निष्कर्ष –

    गुगल पे कसे वापरावे – How to Use Google Pay? हे आपल्याला आता समजले असेल. मला आशा आहे की आपल्याला आजचा लेख व्यवस्थितरित्या समजला असेलच. जर तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा.

    आपल्याला गुगल पे कसे वापरावे संबंधित काहीही अडचण किंवा शंका असेल ते खाली कंमेंट करून नक्की विचारा, आम्ही आपली समस्या सोडवण्याचा प्रयत्न करूत. लेखात काही नवीन शिकायला मिळाले असेल तर हा लेख मित्रांसोबत शेअर करण्यास विसरू नका.

    अश्याच प्रकारच्या अधिक माहितीसाठी या ब्लॉगला वारंवार भेट देत राहा व मित्रांनाही या ब्लॉगबद्दल नक्की सांगा. धन्यवाद!

Leave a Comment